गाव तिथे कृषी उद्योग गरजेचे

गाव तिथे कृषी उद्योग गरजेचे
Published on: 
NSK26H33255 जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे व्‍याख्‍यानात बोलताना अनिल भोकरे. –––– गाव तिथे कृषी उद्योग गरजेचे (उपशीर्षक) अनिल भोकरे : रोटरी क्लब सेंट्रलतर्फे व्‍याख्‍यान सकाळ वृत्‍तसेवा जळगाव, ता. २३ : ऑनलाइन मार्केटिंगद्वारे सर्व वस्तू व सेवा आपल्या गावात पोहोचत आहे, तर आपले कृषी उत्पादने - पूरक व्यवसाय आणि सेवा आपण याच पद्धतीने पोहोचू शकतो. यामुळे ग्रामीण भागात गाव तिथे कृषी उद्योग निर्माण होणे काळाची गरज असल्‍याचे मत कृषी व ग्रामविकास तज्ज्ञ अनिल भोकरे यांनी माडले. गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे आयोजित व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. याप्रसंगी अध्यक्ष ॲड. केतन ढाके, मानद सचिव दीपक नाथानी यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी हा प्रमुख उत्पन्नाचा स्त्रोत असून आज नागरिक पुन्हा पूर्वीच्या जीवनशैलीकडे वळत आहे. ही शेतकरी व ग्रामीण भागातील व्यक्तींसाठी सुवर्ण संधी आहे. कारण जर ऑनलाइन मार्केटिंगद्वारे सर्व वस्तू व सेवा आपल्या गावात पोहोचत आहे, तर आपले कृषी उत्पादने - पूरक व्यवसाय आणि सेवापण पोहोचू शकतो, असे भोकरे यांनी बोलताना सांगितले. त्यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सविस्तर माहिती दिली. माजी मानद सचिव रवींद्र वाणी यांनी परिचय करून दिला तर दिलीप लुनिया यांनी आभार मानले. ––––––––

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com