सटाणा- तीन महिन्यांपासून उन्हाळ कांदा मातीमोल विकला जात असून, सरासरी तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दर गृहीत धरून राज्याच्या कृषिमंत्र्यांनी भावांतर योजना लागू करावी, अन्यथा मातीमोल विक्री झालेल्या कांद्याच्या ट्रॉली कृषिमंत्र्यांच्या दारात ओतू, असा संतप्त इशारा बागलाण तालुका कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे दिला.