चांदवड- पावसाळा सुरू होण्यापूर्वीच चांदवड तालुक्यातील जमीन उफाळून आली आहेत. सलग वीस पंचवीस दिवस चाललेल्या या पावसामुळे जमिनीची मशागत करता आली नसल्याने खरिपाचे नियोजन कोलमडले आहे. अनेक शेतकऱ्यांना नांगरट करता आली नाही. तर या अवकाळी पावसामुळे चांदवड तालुक्यात शेती पिकांचे झाले मोठे नुकसान प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.