लासलगाव- केंद्र सरकारने १ जूनपासून कांदा निर्यातीवरील १.९ टक्के प्रोत्साहन योजना रद्द केल्याने निर्यातदारांमध्ये असंतोषाची लाट उसळली होती. ‘सकाळ’ने या विषयाची गांभीर्याने दखल घेतली आणि प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला. परिणामी, केंद्र सरकारने निर्णयावर पुनर्विचार करत ही योजना पुन्हा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.