येवला- अवकाळीने उसंत दिल्याने बळीराजाला खरिपाचे वेध लागले आहेत. पावसाची स्थिती बदलल्याने आता पेरणीचे समीकरणही बदलणार असल्याने शेतकरी आतापासूनच नियोजनाला लागले आहेत. बाजारात अनेक कंपन्यांची बियाणे येऊ लागल्याने निकृष्ट उगवण क्षमता, बोगस बियाणे यातून शेतकऱ्यांना फटका बसल्याचा अनुभव पाठीशी असल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना परिपूर्ण काळजी घेण्याची गरज असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.