सिन्नर- यावर्षी मॉन्सून पूर्व पावसाने मे महिन्यातच सुरुवात केल्याने अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. पावसाळ्यामध्ये शेतात कामे करीत असताना सर्पदंशाच्या घटना अधिक प्रमाणात घडतात. सर्पदंशानंतर शेतकऱ्यांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात व काय खबरदारी घ्यावी या संदर्भात अनेक वेळा माहिती देण्यात येते. तरीदेखील दुर्घटना घडत असल्याने शेतकरी व नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन सर्पमित्रांकडून करण्यात येत आहे.