संपत ढोली : सिन्नर- ‘‘हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लाटांनी हिरावून नेला. शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत त्यांचा संसार वाहून गेला, आणि मागे राहिलं ते फक्त दुःखाचं पाणी. ३०० क्विंटल कांदा वाहून गेला, उरलेला सडला, हे पाहून नुसती माती नाही, तर माणूसही ओलाचिंब झाला... डोळे पाणावले, आणि एकच हताश सवाल गगनात घुमू लागला- ‘सांगा, जगायचं कसं?’ ही बोल होती ती ३०० क्विंटल कांदा वाहून गेलेल्या उत्पादक दिनकर सानप व अमोल गोळेसर यांची.