कळवण- टोमॅटोचा दर कोसळल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. अनेकांनी टोमॅटो रस्त्यावर व शेतात फेकल्याचे दिसून येत आहे. दराअभावी शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. टोमॅटोचा दर पडल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत..मार्च- एप्रिलमध्ये तीव्र उन्हाळा व मे महिन्यात सलग १५ दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले. परिसरातील बागायती फळभाज्यांनाही त्याचा फटका बसला. भाजीपाल्याची गुणवत्ता ढासळल्याने दर कोसळले आहे. जास्त फटका टोमॅटोला बसला आहे. अतिपावसाने टोमॅटोचा रंग बदलल्याने बाजारात दर कोसळले. दरच पडल्याने शेतातील टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यावे लागत आहेत..तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना लाखो रुपये मिळवून देणारा टोमॅटो शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. किलोला १८० ते २०० रुपयांप्रमाणे असलेल्या टोमॅटोच्या दराला आता कवडीमोल भाव आला आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोला १० ते १५ रुपये किलो असा दर मिळत आहे. होलसेलमध्ये पाच ते आठ रुपयांपर्यंत दर मिळत आहे. .Malegaon Accident News : बकरी ईदच्या दिवशी दु:खद अपघात; युवकांच्या मृत्यूने हळहळ उडाली.गेल्या वर्षी या दिवसात सरासरी १२००ते २००० रुपये प्रतिक्रेट दराने विकला गेलेला टॉमेटो या वर्षी १०० ते ३०० रुपये प्रतिक्रेटवर आला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. यामुळे दर नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून रोष व्यक्त करत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.