येवला- दोन दिवसांच्या उघडिपीनंतर शहर व तालुक्याला बुधवारी (ता. २८) पावसाने चांगलेच झोडपले. सकाळी दिवस उजाडताच सुरू झालेला पाऊस दुपारी दोनपर्यंत कमी-अधिक प्रमाणात सुरू होता. देशमाने येथे एका शेतकऱ्याच्या विहिरीचा कठडा ढासळून बाजूला असलेले कांदे पूर्णतः विहिरीत पडून मोठे नुकसान झाले. देशमाने, भारमसह विविध भागांत कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. बुधवारी अंदाजे ५० मिलिमीटरच्या आसपास पाऊस झाल्याचा अंदाज आहे.