हरभरा विक्रीत कृषी विज्ञान केंद्राची ४.४९ लाखांची फसवणूक

हरभरा विक्रीत कृषी विज्ञान केंद्राची ४.४९ लाखांची फसवणूक
Published on: 
कृषी विज्ञान केंद्राची साडेचार लाखांची फसवणूक १६१ क्विंटल हरभऱ्याचे पैसे थकविले; धनादेश अनादरप्रकरणी विक्रेत्याविरुद्ध गुन्हा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १८ : ममुराबाद रस्त्यावरील कृषी विज्ञान केंद्राकडून विक्री करण्यात आलेल्या १६१.१४ क्विंटल हरभऱ्याचे पूर्ण पैसे न देता ४ लाख ४९ हजार ९०३ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित रवींद्र नंदलाल व्यास (रा. धानोरा, ता. चोपडा) याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विज्ञान केंद्राकडून विविध पिकांचे बीजोत्पादन करून शेतकऱ्यांना बियाण्यांची विक्री केली जाते. तसेच शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदी करून त्यांची बाजारात विक्रीही केली जाते. याच व्यवहारातून २६ जुलै २०२३ रोजी समितीच्या मंजुरीने रवींद्र व्यास याच्यामार्फत चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत १६१.१४ क्विंटल हरभरा विकण्यात आला. त्यापोटी केंद्राला ५ लाख ८५ हजार १०२ रुपयांचा धनादेश देण्यात आला; मात्र तो वटला नाही. त्यानंतर दिलेले दुसरे धनादेशही वटले नाहीत. चौकट पैसे देण्यास टाळाटाळ पाठपुराव्यानंतर व्यासच्या भावाच्या खात्यातून ३५ हजार १०९ रुपये आणि नंतर एक लाख रुपये ऑनलाइन जमा करण्यात आले. मात्र उर्वरित ४ लाख ४९ हजार ९०३ रुपये देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अखेर या प्रकरणी कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. हेमंत बाहेती यांनी मंगळवारी (ता. १७) तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिस कर्मचारी प्रकाश चिंचोरे तपास करत आहेत.