सिन्नर- पोलिस दलाच्या डायल ११२ या क्रमांकावर आजारी असलेल्या वडिलांना दवाखान्यात पोहोचविण्यासाठी मदत मागणारा कॉल अटेंड करणाऱ्या पोलिसास कॉल करणाऱ्या व्यक्तीनेच धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचा प्रकार सिन्नर तालुक्यातील कणकोरी येथे घडला. या प्रकरणी वावी पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.