नाशिक- द्वारका सर्कलवरील वाहतुक कोंडीवर उपाय म्हणून आर्टीफिशिअल इंटेलिजन्ट (एआय) तंत्रज्ञानावर आधारीत सिग्नल यंत्रणा बसविली जात आहे. त्याच धर्तीवर शहरात २८ ठिकाणी याच तंत्रज्ञानावर आधारीत सिग्नल बसविले जाणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीकडून निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.