सातपुड्यातील देहवाली भिली भाषेला मिळणार जागतिक ओळख

सातपुड्यातील देहवाली भिली भाषेला मिळणार जागतिक ओळख
Published on: 
NSK26H35240 लोय (ता. नंदुरबार) : बैठकीस उपस्थित ब्रायन लोनर्गन, श्रीमती कॅरोल किर्चनर, मनू चोप्रा, ऐना आसिफ, भिमसिंग वळवी, वैष्णवी रामडोहकर, कमलेश महाले संतोष वळवी, अंकित वळवी, शुभांगी वळवी, प्रफुल्ल वसावे, गौतम वळवी, रोशनी पाडवी, वंदना पाडवी आदी. --- ‘एआय’मुळे देहवाली भिली भाषेला जागतिक ओळख --- अभ्यासासाठी अमेरिकेचे ब्रायन लोनर्गन, कॅरोल किर्चनर नंदुरबारात सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १७ : सातपुड्याच्या दुर्गम भागात बोलली जाणारी ‘देहवाली भिली’ आणि इतर स्थानिक आदिवासी बोलीभाषांचे संवर्धन करून त्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने अमेरिकेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता. १७) नंदुरबारात भेट दिली. त्यांनी नंदुरबार तालुक्यातील लोय गावाला भेट देऊन एआय तंत्रज्ञानाच्या आधारे देहवाली बोलीभोषवर काम करीत असलेल्या विविध तज्ज्ञांची भेट घेऊन संवाद साधला. अमेरिकेतील धर्मादाय लेदिर फाउंडेशन आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था ‘कार्या’ यांच्या संयुक्त विद्यमाने ही दाता भेट आयोजित केली होती. या दौऱ्यात लेदिर फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष ब्रायन लोनर्गन, श्रीमती कॅरोल किर्चनर यांच्यासह कार्या संस्थेचे संस्थापक मनू चोप्रा, ऐना आसिफ यांनी भाग घेतला. शिष्टमंडळाने लोय गावातील ग्रामस्थांशी संवाद साधून देहवाली भिली भाषेतील डेटा संकलन आणि डिजिटल तंत्रज्ञानात या भाषेचा वापर कसा केला जात आहे, याची प्रत्यक्ष पाहणी केली. आदिवासी समाजाच्या समृद्ध बोलीभाषा केवळ संवादापुरत्या मर्यादित न राहता, जगातील आधुनिक एआय प्रणालींमध्ये त्यांचा समावेश व्हावा. जेणेकरून स्थानिक नागरिकांना त्यांच्याच भाषेत तंत्रज्ञानाचा लाभ घेता येईल. त्यातून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. लेदिर फाउंडेशनचे मुख्य कार्यालय अमेरिकेतील वाशिंग्टनच्या सिएटल येथे असून, ही संस्था जागतिक स्तरावर गरिबी निर्मूलन आणि एआय तंत्रज्ञानाच्या सकारात्मक वापरासाठी कार्यरत आहे. आदिवासी भागात बोलीभाषांच्या विकासासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. नंदुरबार जिल्ह्यातील या नावीन्यपूर्ण उपक्रमाची त्यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली. या भेटीदरम्यान आदिवासी मौखिक साहित्य परिषदेचे मुख्य संयोजक भिमसिंग वळवी, नीति आयोगाच्या जिल्हा समन्वयक वैष्णवी रामडोहकर आणि कार्या संस्थेचे जिल्हा समन्वयक कमलेश महाले यांनी जिल्ह्यातील या प्रकल्पाची सविस्तर माहिती शिष्टमंडळाला दिली. शिष्टमंडळाची ही भेट यशस्वी आयोजनासाठी समन्वयक संतोष वळवी, अंकित वळवी, शुभांगी वळवी, प्रफुल्ल वसावे, गौतम वळवी, रोशनी पाडवी आणि वंदना पाडवी यांनी सहकार्य केले. या आंतरराष्ट्रीय भेटीमुळे नंदुरबारमधील आदिवासी बोलीभाषांच्या संवर्धनाच्या कामाला मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.