लासलगा- हवामान बदलांचा सामना करत असलेल्या बळीराजासाठी आता एक मोठा दिलासा मिळणार आहे. महासंगणकांशिवायही अचूक आणि जलद हवामान अंदाज मिळणे शक्य होणार आहे आणि हे शक्य होणार आहे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानामुळे. त्यामुळे बागायती, नगदी आणि निर्यातक्षम पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून, संभाव्य आर्थिक हानी टाळता येणार आहे.