एआयमुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल अभय सुपेकर यांचे प्रतिपादन

एआयमुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल  अभय सुपेकर यांचे प्रतिपादन
Published on: 
टुडे-- पान-३ साठी ---------- PML26B10235 पिंपळगाव बसवंत ः येथील वाघ महाविद्यालयात व्याख्यानाप्रसंगी बोलताना सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. वसंत कदम, उपप्राचार्य डॉ. दिलीप माळोदे, डॉ. ज्ञानेश्वर सातभाई, प्रा. भगवान कडलग, प्रा. डॉ. किरणकुमार जोहरे आदी. ------------------ ‘एआय’मुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल ------------- अभय सुपेकर ः पिंपळगावच्या क. का. वाघ महाविद्यालयात व्याख्यान -------------- सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता.९ ः एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता सध्या किती वेगाने बदलत आहे, हे आपण पाहत आहोत. कुठलीही क्रांती किंवा उत्क्रांती एका दिवसात होत नसते. त्यासाठी अनेक दिवस जाऊ द्यावे लागतात, एआयच्या क्रांतीमुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल होतील असे प्रतिपादन ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर यांनी केले. ------------------ पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयात आयोजित ‘एआयमुळे जागतिक पातळीवरील बदल’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. वसंत कदम, उपप्राचार्य डॉ. दिलीप माळोदे, प्रा. भगवान कडलग, डॉ. डी. के. सातभाई, डॉ. एस. के. मोरे, प्रा. डॉ. किरणकुमार जोहरे उपस्थित होते. श्री. सुपेकर यांनी प्रिंट मीडियाचा आतापर्यंतचा प्रवास आणि सध्या एआयचा वापर यावर सुरवातीला सविस्तर माहिती दिली. आपण काळानुसार बदललो नाही तर स्पर्धेत टिकाव लागणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी आणि नेमकेपणाने वापर करण्याची गरज आहे. वैज्ञानिक प्रगतीचा वेग जागतिक पातळीवरील ज्या पद्धतीने बदलत आहे याबाबत सविस्तर मांडणी केली जात आहे. एकीकडे काही देशांमध्ये तरुणांना काम मिळत नाही तर दुसरीकडे आपल्या देशात कौशल्याधारीत कामगार मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे ही स्थिती बदलण्यासाठी ''स्किल इंडिया''च्या माध्यमातून काम केले जात आहे, तरुणांनी त्याकडेही लक्ष द्यावे. प्राचार्य डॉ. कदम यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी जीवन, शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात वेगाने बदल घडत असल्याचे नमूद केले. या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी न घेता कौशल्ये आत्मसात करावीत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन केले. डॉ. किरणकुमार जोहरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जी. पी. वीर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. डी. के सातभाई यांनी आभार मानले. -------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com