फोटो ओळी- 12012
मालेगाव शहर : मसगा महाविद्यालयात विज्ञान संघटनेचे उद्गाटन व आविष्कार कार्यशाळेप्रसंगी बोलताना डॉ. किरणकुमार जोहरे. शेजारी प्राचार्य डॉ. सुभाष निकम आदी.
मसगा महाविद्यालयात
आविष्कार कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव शहर, ता. २ : एआय तंत्रज्ञानाचा वापर आपण कशा पद्धतीने वापर करतो, यावरच त्याचे परिणाम अवलंबून असल्याचे डॉ. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले. मसगा महाविद्यालयात आंतरिक गुणवत्ता हमी कक्ष अंतर्गत विज्ञान संघटनेचे उद्घाटन व आविष्कार कार्यशाळेत ते ‘एआय आणि भविष्यातील विज्ञान’ या विषयावर बोलत होते. प्राचार्य डॉ. सुभाष निकम, उपप्राचार्य डॉ. मनीष सोनवणे, पर्यवेक्षक प्रा. पी. ए. अहिरे उपस्थित होते.
डॉ. जोहरे म्हणाले, की एआय तंत्रज्ञान मानवाने विकसित केलेल्या अल्गोरिदम, डेटासेट आणि संगणकीय प्रणालींवर आधारित तंत्रज्ञान आहे. मोठ्या प्रमाणातील मानवी निर्मित माहितीतील नमुने ओळखून त्यावर आधारित अंदाज व उत्तर निर्माण करण्याचे काम एआय करते. त्यामुळे एआय मानवी ज्ञान व वर्तनातील नमुन्यांचे अनुकरण करते.
‘एआय’साठी मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर्स, संगणकीय चिप्स, नेटवर्किंग व्यवस्था, ऊर्जा व इंटरनेट पायाभूत सुविधा आवश्यक असतात. या भौतिक पायाभूत सुविधांची निर्मिती, देखभाल आणि विस्तार करण्यासाठी मानवी कौशल्य, उद्योग आणि संसाधनांची गरज असून, मानवी नियंत्रण व सुरक्षा व्यवस्था महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.