सातपूर- अंबड इंडस्ट्रीज ॲन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) व जिल्हा कौशल्य विकास विभागातर्फे आयमा रिक्रिएशन हॉलमध्ये झालेल्या रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे सुमारे १५० बेरोजगारांचा रोजगाराचा मार्ग खुला झाल्याने मेळाव्याचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल झाला, असे ‘आयमा’चे अध्यक्ष ललित बूब यांनी सांगितले. मेळाव्यामुळे उद्योग क्षेत्राला अधिक बूस्ट मिळेल, असा विश्वास लुसी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक राजू गाढवे यांनी व्यक्त केला.