सातपूर: नाशिकमध्ये उद्योगांच्या विकासासाठी पोषक वातावरण असून, ‘आयमा इंडेक्स महाकुंभ’ला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन उद्योग सचिव पी. अन्बलगन यांनी केले. त्यांनी उद्योजकांना ‘मैत्री पोर्टल’चा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले. उद्योजकांच्या हितासाठी नवीन उद्योग धोरण आणले जाणार असून, त्यात १५ नवीन बाबींचा समावेश असेल, असेही सूतोवाच त्यांनी आपल्या भाषणात केले.