Latest Marathi News | वायुसेनेच्या जवानाची गोळी झाडून आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death News

Nashik : वायुसेनेच्या जवानाची गोळी झाडून आत्महत्या

नाशिक : देवळाली कॅम्प येथे भारतीय वायु सेनेच्या (एअरफोर्स) जवानाने स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. सदरची घटना शुक्रवारी (ता.२१) सायंकाळी घडली. वीरेंद्र श्रीरामपाल कुमार (वय २८, रा. देवळाली एअरफॉर्स., मूळ रा. बिहार) असे मयत जवानाचे नाव आहे. (Air Force personnel shot committed suicide Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik : राज्यात आंतरजातीय विवाहास संरक्षण; जात पंचायतींना बंदीचे गृह मंत्रालयाचा आदेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायु सेनेचे जवान वीरेंद्र कुमार हे शुक्रवारीच (ता.२१) कर्तव्यावर हजर झाल्याचे सांगण्यात येते. सायंकाळच्या सुमारास एकांतात असताना वीरेंद्र कुमार यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेतली. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना गंभीर स्थितीमध्ये तत्काळ रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. मात्र या घटनेमुळे देवळाली कॅम्प परिसरात खळबळ उडाली.

हेही वाचा: Dada Bhuse : अवकाळीच्या नुकसानीचे जागेवर पंचनामे : पालकमंत्री दादा भुसे