Nashik Air Show
sakal
नाशिक: भारतीय वायुसेनाच्या ‘सूर्यकिरण ॲरोबॅटिक पथक’तर्फे नाशिकमध्ये प्रथमच भव्य हवाई कसरतींचे आयोजन करण्यात आले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती व प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने गुरुवारी (ता. २२) आणि शुक्रवारी (ता. २३) सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत गंगापूर धरण परिसरात हा एरोबॅटिक शो रंगणार आहे.