esakal | विमानसेवा सुरु तर होतेय....पण 'या' सेवेबाबत अस्पष्टताच!
sakal

बोलून बातमी शोधा

 air plane.jpg

ओझर विमानतळावरून टू जेट विमान कंपनीच्या वतीने अहमदाबाद-नाशिक विमानसेवा दिली जाते. कंपनीकडून सेवा सुरु करण्याचे घोषित करण्यात आले असून ओझर विमानतळ प्राधिकरणाला तसे कळविण्यात आले आहे.

विमानसेवा सुरु तर होतेय....पण 'या' सेवेबाबत अस्पष्टताच!

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

नाशिक : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून केंद्रीय नागरी उड्डान मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता तीन महिन्याच्या अंतराने येत्या (ता.25) मे पासून सेवा सुरु केली जाणार आहे. त्यासाठी बुकींग देखील सुरु झाले आहे. परंतू नाशिक हून पुणे, अहमदाबाद, हैद्राबाद सेवेबाबत अस्पष्टता आहे. टू जेट ची अहमदाबाद हवाई सेवा सुरु करण्यासाठी सिव्हील एव्हीएशन महासंचालकांनी परवानगी दिली आहे. परंतु पुणे व हैद्राबाद सेवेला अद्याप परवानगी मिळाली नाही व अलायन्स हवाई कंपनीने देखील ओझर विमानतळ व्यवस्थापनाशी अद्यापपर्यंत संपर्क न केल्याने या सेवेसंदर्भात अद्याप संभ्रम आहे. 

घोषणेनुसार विमान कंपन्यांचे बुकींग सुरु
केंद्र सरकारच्या उडान-2 योजनेंतर्गत ओझर (नाशिक) विमानतळावरून मुंबई, पुणे, हैद्राबाद व अहमदाबाद अशी विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. मुंबई सेवा तुर्त बंद असली तरी ईतर सेवा मात्र सुरळीत आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग होवू नये म्हणून केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने देशाबाहेरील व देशांतर्गत विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार वीस मार्च पासून ओझर येथून विमानसेवा बंद करण्यात आली आहे. परंतू गेल्या आठवड्यात केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री हरदिप कौर यांनी 25 पासून विमानसेवा सुरु करण्याची घोषणा केली त्यानुसार विमान कंपन्यांनी बुकींग सुरु केले आहे.

अद्यापर्यंत कुठल्याचं सुचना दिल्या नाही

ओझर विमानतळावरून टू जेट विमान कंपनीच्या वतीने अहमदाबाद-नाशिक विमानसेवा दिली जाते. कंपनीकडून सेवा सुरु करण्याचे घोषित करण्यात आले असून ओझर विमानतळ प्राधिकरणाला तसे कळविण्यात आले आहे. अलायन्सच्या वतीने अहमदाबाद-नाशिक- हैद्राबाद तसेच नाशिक-पुणे सेवा चालविली जाते. परंतु कंपनीकडून जिल्हाधिकारी व ग्रामिण पोलिस अधिक्षकांशी संपर्क साधण्यात आला. तेव्हा सिव्हील एव्हीएशन महासंचालकांनी (डीजीसीए) अद्यापर्यंत कुठल्याचं सुचना दिल्या नसल्याचे सांगण्यात आले.

अहमदाबादच्या वेळेत बदल 
अलायन्सचे विमान ओझर विमानतळावर पुणे येथून तीन वाजता पोहोचेल व पाच वाजता हैद्राबादकडे उड्डाण करेल असे नियोजन आहे. परंतू डीजीसीएच्या मंजुरी नंतर हि सेवा सुरु होईल. अहमदाबादहून पुर्वी सकाळी आठ वाजता विमानाचे लॅण्डींग व्हायचे परंतू आता वेळेत बदल करण्यात आला असून संध्याकाळी सव्वा सात वाजता विमान तळावर पोहोचेल त्यानंतर साडे सात वाजता हैद्राबादकडे उड्डाण होईल. 
 

loading image
go to top