Ajay Borisa
sakal
नाशिक: विसे मळा परिसरात युवकावर गोळी झाडून ठार करण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील संशयित व सराईत गुन्हेगार अजय बोरिसा यास शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सोमवारी (ता. १३) अटक केली. त्याला शुक्रवार (ता. १७)पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस कोठडीत असलेल्या मामा राजवाडेसह सातही संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे त्यांची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.