narhari zirwal with ajit pawar
sakal
वणी (नाशिक) - राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्या शब्दात त्यांच्या राजकिय प्रवासातील विविध प्रसंग व आठवणींनी स्व. दादांना वाहिलेली श्रध्दांजली...
राजकारणात अनेक नेते भेटतात, पण आयुष्य घडवणारे, माणूस म्हणून उभं करणारे नेते फारच थोडे असतात. माझ्या राजकीय आणि सामाजिक आयुष्याला दिशा देणारे, प्रत्येक कठीण काळात पाठीशी उभे राहणारे असे नेते म्हणजे अजितदादा पवार..