Ajit Pawar
sakal
ओझर: ओझर शहराचा पाणी प्रश्न, कचरा व्यवस्थापन आणि रस्त्यांच्या अडचणी कायमस्वरूपी सोडवून ‘मिनी भारत’ म्हणून ओळख असलेल्या ओझरचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण पॅनल निवडून द्या, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता.१) प्रचारसभेत केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रज्ञाताई हेमराज जाधव आणि सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.