ॲंकर
NSK26H33644
जळगाव : अजमीढ जयंती महोत्सवात निघालेली शोभायात्रा.
.......
अजमीढ जयंती महोत्सवात शोभायात्रेने वेधले लक्ष
रक्तदान शिबिरासह विविध उपक्रम; श्री मेढ क्षत्रिय सुवर्णकार समाजाचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २७ : धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक बांधिलकीचा संगम साधत श्री मेढ क्षत्रिय सुवर्णकार युवक मंडळातर्फे श्री अजमीढ जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. भव्य शोभायात्रा, अजमीढ महाराजांची आकर्षक वेशभूषा, रक्तदान उपक्रम आणि मुंबईचे कलाकार विनय नाटेकर यांच्या ‘परफेक्ट शो’मुळे महोत्सवाला विशेष रंगत आली.
महोत्सवाच्या पूर्वसंध्येला पांजरापोळ गोशाळेत महिला मंडळाच्या वतीने महिला संगीत कार्यक्रम घेण्यात आला. महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यानंतर शहर व जिल्हा संघटनेची संयुक्त बैठक झाली. तसेच सराफ बाजारातून शोभायात्रेला प्रारंभ झाला. आकर्षक रथ, चार घोडे आणि धार्मिक उत्साहाने भारलेल्या वातावरणात निघालेल्या या शोभायात्रेत समाजबांधवांसह युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. श्री महावीरजी गौरखनाथ वर्मा यांनी धारण केलेली श्री अजमीढ महाराजांची वेशभूषा शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरली. त्यांच्या या रूपाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
दरम्यान, पांजरापोळ गोशाळेत रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच मनोरंजन कार्यक्रमाला समाजबांधवांची उपस्थिती होते. यावेळी शहर व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी, महिला मंडळाच्या सदस्या, युवक आणि समाजबांधवांच्या उपस्थितीत होते.
.....