Nashik Ajoba Gad
sakal
नाशिक: नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीवरील आजोबा गडावर आलेल्या मुंबई आणि ठाण्यातील बारा गिर्यारोहकांची लष्करी अधिकाऱ्यांनी सुखरुप सुटका केली. अहिल्यानगर येथील लष्करी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी नाशिकच्या लष्करी अधिकाऱ्यांशी संर्पक साधला. नाशिक अधिकाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने चोवीस तास प्रयत्न करुन सर्वाना सुखरूप सोडविले.