विखरण विद्यालयात
आकाश कंदील स्पर्धा
म्हसदी, ता. ८ : येथील श्री. धंगाई विधायक कार्य मंडळाच्या विखरण (ता. नंदुरबार) येथील श्री.आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालयात दीपावली सणाच्या उत्सवानिमित्त आकाश कंदील निर्मिती स्पर्धा घेण्यात आली. पाचवी ते सातवी अ गट, तर आठवी ते दहावी ब गटात स्पर्धा घेण्यात आली.
खोंडामळीच्या केंद्रप्रमुख निकिता जाधव, माजी प्रभारी केंद्रप्रमुख आनंदराव करणकाळ, मुख्याध्यापक दासू गांगुर्डे, बापू ठाकरे, उपशिक्षक एम. डी. नेरकर, वाय. डी. बागूल, डॉ. आर. आर. बागूल यांच्या परीक्षणातून ‘अ’ गटातून प्रथम सोहम ठाकूर, द्वितीय आरोही मराठे, तृतीय चैताली पाटील, दीक्षा पाटीलने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. तसेच, ‘ब’ गटातून प्रथम मानसी पाटील, द्वितीय तुषार पाटील, तृतीय दिव्या ठाकरे, तर सलोनी भील उत्तेजनार्थ बक्षीसाची मानकरी ठरली. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक डी. डी. साळुंके यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आले. उपशिक्षक सी. व्ही. नांद्रे, एस. एच. गायकवाड, डी. बी. भारती, एम. एस. मराठे, ए. एस. बेडसे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा यशस्वीतेसाठी जे. एस. पाटील, एस. जी. पाटील, एच. एम. खैरनार यांनी परिश्रम घेतले.