State Level Drama Competition : राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘आखाडा’ ची बाजी!

पालकमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
All the winning artists were felicitated by the Guardian Minister Dada Bhuse.
All the winning artists were felicitated by the Guardian Minister Dada Bhuse.esakal

State Level Drama Competition : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे घेण्यात आलेल्या कै. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत एकदम कडक नाट्यसंस्थेच्या ‘आखाडा’ या नाटकाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

‘असाही एक कलावंत’ नाटकाने द्वितीय तर, ‘ओल्या भिंती’ या नाटकाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सर्व विजेत्या कलावंतांचा सत्कार करण्यात आला. (Akhada wins in state level singles drama competition nashik news)

महाकवी कालिदास कलामंदिरात शुक्रवार (ता. २६) पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. या वेळी पालकमंत्री भुसे, नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, उपाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, महापालिका उपायुक्त करुणा डहाळे, कालिदास कलामंदिराचे व्यवस्थापक मोहन गिते, विश्वजित धर्माधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रमुख अतिथींच्या हस्ते एकांकिका स्पर्धेत पहिल्या तीन नाटकांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.

या वेळी पालकमंत्री भुसे म्हणाले, एकांकिका स्पर्धा या पर्वणीसारख्या आहेत, त्यांनी सिनेसृष्टीला अनेक कलावंत दिले. नाट्यक्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

All the winning artists were felicitated by the Guardian Minister Dada Bhuse.
HSC Success Story : उसनवारीच्या पुस्तकातून यशाला गवसणी!

प्रा. रवींद्र कदम म्हणाले, रंगमंच हा कलावंतांवर संस्कार घडवण्याचे काम करतो. त्यामुळे प्रत्येक कलाकाराने दुसऱ्यांचे प्रयोग बघितले पाहिजे. त्यातून शिकल्यानंतर, अनुभवल्यानंतर कलाकार घडतो. त्याची उणीव या ठिकाणी प्रकर्षाने जाणवली.

नाशिकची रंगभूमी सक्षम करण्यासाठी दहा वर्षांपासून होणाऱ्या या स्पर्धा पुढील वर्षापासून पाच दिवस होतील. विशेष म्हणजे पारितोषिकाची रक्कमही वाढवली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सोशल मीडियाच्या काळात नाटकांसारख्या प्रभावी माध्यमातून अभिव्यक्तीला न्याय देत असल्याबद्दल डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी कलाकारांचे आभार मानले. परीक्षक म्हणून संजय दळवी, आदिती मोराणकर, पियुष नाशिककर यांनी जबाबदारी सांभाळली. राजेश भुसारे यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

All the winning artists were felicitated by the Guardian Minister Dada Bhuse.
Agitation : ऊसतोडणी कामगार आणि मुकादमांच्या मागण्यांसाठी १२ जूनला आझाद मैदानावर आंदोलन

नाट्यस्पर्धेतील विजेते

एकांकिका

प्रथम : आखाडा : २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
द्वितीय : असाही एक कलावंत : २० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
तृतीय : ओल्या भिंती : १५ हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ : नातीचरामी

दिग्दर्शन

प्रणय गायकवाड : आखाडा
रूपेश अहिरे : असाही एक कलावंत
योगेश कदम : ओल्या भिंती
किरण साष्टे : नातिचरामी

अभिनय

राघवेंद्र कुलकर्णी : असाही एक कलावंत
औदुंबर बाबर : आखाडा
शुभम लांडगे : एकांकिका करता का

अभिनय स्त्री

विजया गुंडप : आखाडा
सायली हेंद्रे : नातिचरामी
साक्षी माणचेकर : पडदा

सर्वोत्कृष्ट लेखन : पडदा : अजय पाटील आदिती जमदरे

नेपथ्य

वेदांत पावसकर, ममता गुप्ता : मैय्या
आखाडा

ओम, स्वरांगी, शरण : असाही एक कलावंत

प्रकाशयोजना

संकेत पारखे, अजय इंगळे : असाही एक कलावंत
राजेश शिंदे : मैय्या
श्याम चव्हाण : सूप

पार्श्वसंगीत

योगेश कदम : ओल्या भिंती
शिवम भागवत : असाही एक कलावंत
वेदांत, मानस, मयुरेश : मैय्

All the winning artists were felicitated by the Guardian Minister Dada Bhuse.
Chanakya Niti : 'या' व्यक्तीकडे कधीच टिकत नाही पैसा, वेळीच व्हा सावध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com