Akhil Bharatiya Sahitya Sammelan
sakal
नाशिक
Akhil Bharatiya Sahitya Sammelan : साहित्यिक कुंभमेळा! अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे १०० वे अधिवेशन नाशिकमध्ये होणार?
Kumbh Mela 2027 as Cultural and Literary Platform : २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे १०० वे अधिवेशन आयोजित करण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे.
नाशिक: अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथे घेण्याबाबत नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे सातारा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात अधिकृत प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे समजते. २०२७ मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे साहित्य संमेलन प्रस्तावित करण्यात येत असून, या संदर्भात संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती आहे. सर्व बाबी अनुकूल ठरल्यास अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ऐतिहासिक १०० वे अधिवेशन नाशिकमध्ये होण्याचा मार्ग मोकळा होईल.
