धुळे अक्कलपाडा प्रकल्प

धुळे अक्कलपाडा प्रकल्प
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी -- फोटो क्रमांक : 32283....डॉ. सुभाष भामरे -- भूसंपादन मोजणी प्रक्रियेस सुरुवात - निम्न पांझरा अक्कलपाडा प्रकल्प शंभर टक्के भरणार - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १३ : निम्न पांझरा अक्कलपाडा मध्यम सिंचन प्रकल्पात शंभर टक्के जलसाठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त भूसंपादन मोजणी प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. याबाबत तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले असून, यामुळे धुळे तालुक्यासाठी दीड टीएमसी (1.5 TMC) अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर झाला आहे, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. ते म्हणाले, की अक्कलपाडा प्रकल्पाचे काम २०१७ मध्ये पूर्ण झाल्यानंतर जलसाठा करण्यास सुरुवात झाली होती. प्रकल्प पूर्ण भरल्यानंतर अद्याप अधिग्रहण न केलेल्या शेतजमिनींमध्ये पाणी शिरल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत होते. ही अडचण लक्षात घेऊन शासनाने धरण केवळ ६५ टक्के भरण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून धरण पूर्ण क्षमतेने भरले जात नव्हते. या समस्येवर मात करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सतत पाठपुरावा केला. उर्वरित जमिनींचे अधिग्रहण केल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरू शकेल आणि सिंचन तसेच पिण्यासाठी अतिरिक्त दीड टीएमसी पाणी उपलब्ध होईल, अशी बाब तत्कालीन सरकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. या पाठपुराव्याची दखल घेत दोन वर्षांपूर्वीच शासनाकडून या कामाला तत्त्वतः मान्यता मिळाली होती. प्रशासन स्तरावरही पाठपुरावा सुरूच होता. चार महिन्यांपूर्वी जलसंपदामंत्र्यांनी या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याने अतिरिक्त जमीन अधिग्रहानाचा मार्ग मोकळा झाला. परिणामी, आता प्रत्यक्ष मोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, लवकरच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे डॉ. भामरे यांनी नमूद केले. त्यांनी सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, पालकमंत्र्यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com