निसर्ग पर्यटन
फोटो - AML26B00300, AML26B00301, AML26B00302
आमळी : अलालदरी परिसरात कोसळणारा कन्हैयालाल धबधबा. दुसऱ्या छायाचित्रात अलालदरीचा विलोभनीय परिसर. शेवटच्या छायाचित्रात मालनगाव धरण. ( छायाचित्रे: विनायक पाटील )
मूलभूत सुविधांची प्रतीक्षा कायम
----------------------------------
अलालदरीच्या धबधब्यांची पर्यटकांना भुरळ
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आमळी परिसरातील अलालदरी धबधब्यांचे निसर्गवैभव पर्यटकांना भुरळ घालत आहे. पावसाळ्यात हिरवाईने नटणाऱ्या आणि आठ ते नऊ धबधब्यांनी सजणाऱ्या या परिसरात महाराष्ट्रासह गुजरातमधील पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मात्र, पर्यटनविकासासाठी आवश्यक रस्ते, सुरक्षा व्यवस्था आणि मूलभूत सुविधांची प्रतीक्षा कायम आहे.
- विनायक पाटील
निसर्गाचे अगदी भरभरून देणे लाभलेला आमळी (ता. साक्री ) येथील नयनरम्य धार्मिक,ऐतिहासिक पर्यटनासोबतच निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने सध्या पर्यटकांना आकर्षित करीत भरारी घेण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. ह्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतो. खरे पाहता पावसाळ्यात तर हिरवाईने व मनसोक्त कोसळणाऱ्या धबधब्यांनी अलादरीचा परिसराने राज्यासह पर राज्यातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे.तिथे वर्षभर पर्यटकांचा राबता असतो. दरवर्षी गर्दीत मोठी वाढ होत आहे.आमळी येथील सुप्रसिद्ध श्री कन्हैयालाल महाराज (विष्णू भगवान) मंदिरापासून अवघ्या दोन किलोमीटरवर निसर्ग पर्यटनाचे केंद्रबिंदू म्हणून अलालदरी धबधब्यास ओळखले जाते. बहुतांश पर्यटक हे अलालदरीतील निसर्ग व धबधब्यांच्या आकर्षणातून येथे येत असतात. हा परिसर धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांना आकर्षित करीत आहे.
आमळी परिसराला पावसाचे आघार म्हटले जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी झालेल्या पावसानंतर ही परिसरात हिरवाई कायम आहे. यामुळेच पर्यटकांना भुरळ पडत आहे. मात्र तेथे अजूनही चांगले रस्ते, संरक्षणासाठी बॅरिकेट्स, व विविध सोयी सुविधांचा मोठा अभाव आहे. नागपूर- सुरत महामार्गावरील कोंडाईबारी पासून १३ किलोमीटरवर आमळी आहे. येथील सुप्रसिद्ध श्री कन्हैयालाल महाराज मंदिरापासून तर अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हे अलालदरी धबधब्यांचे पर्यटन केंद्र आहे. समुद्रसपाटीपासून १८६० फूट उंच असणारा हा देखणा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. अलालदरी परिसराचे क्षेत्र सुमारे ४.७० किलोमीटर आहे.
उत्तरेकडील पूर्ण भाग हा संरक्षित जंगलाचा, व दऱ्या खोऱ्याचा असून काही अंतरावर नंदुरबार जिल्ह्याची हद्द सुरू होते. अतिशय नयनरम्य परिसर असून दरीत पावसाळ्यात तब्बल आठ ते नऊ धबधबे कोसळतात.पश्चिमेस असणारा ३०० फुटावरून वरून कोसळणारा मुख्य कन्हैयालाल धबधबा पर्यटकांच्या आनंदात मोठी भर घालतो. मत्स्य,जांभाळी आदी धबधबे पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरतात. हा संपूर्ण परिसर वन विभागाच्या ताब्यात आहे. कक्ष क्रमांक १८० व १८२ मध्ये दर येते. दरी पासून उत्तर व पूर्वेला दोन हजार १०९ हेक्टर क्षेत्रात जंगल आहे. परिसरातच धनसरा टेकडी, काबऱ्याखडक, मालनगाव धरण, मालनगाव धरणा जवळ वनविभागाची अडीच हेक्टर क्षेत्रात रोपवाटिका आदी विविध ठिकाणांचा समावेश आहे. वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते. त्यामुळे निसर्गरम्य अलालदरी परिसराने पावसाळ्यात तर राज्यासह लगतच्या गुजरात मधील पर्यटकांचे लक्ष वेधले आहे.
या लेखाला सकाळच्या शैलीनुसार आकर्षक शीर्षक व समर्पक एंट्रो तयार करून द्यावा
अलालदरीला जाण्यासाठी अंतर (किमीमध्ये)
धुळे शहर- ९५
नाशि- १९५
नंदुरबार -५४
नवापूर- ५०
साक्री- ४०
दहिवेल- २०