Latest Marathi News | नाशिक : महापालिकेच्या वास्तूत सर्रास दारूची पार्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

alcohol

नाशिक : महापालिकेच्या वास्तूत सर्रास दारूची पार्टी

जुने नाशिक : महापालिका कार्यालय, शाळा तसेच अन्य वास्तूमध्ये सर्रास दारूच्या पार्ट्या सुरू असतात. विशेष म्हणजे कर्मचारी बाहेरील व्यक्तींना बोलावून पार्ट्या करत असतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने असे प्रकार घडत आहे. शिवाय अशा प्रकारांवर परदा टाकण्याचे काम देखील काही कर्मचारी, अधिकारी करत आहे. (Latest Marathi News)

शनिवार (ता. २३) सुट्टी असल्याची संधी साधत मेनरोड येथील पूर्व विभागीय कार्यालयाच्या घरपट्टी विभागात कार्यालयात नियुक्त कर्मचाऱ्यांची त्याच्या बाहेरील मित्रांसह मद्याची पार्टी रंगली होती. मद्याच्या नशेत त्यांनी त्या ठिकाणी अस्वच्छता केली होती. याबाबत अन्य कर्मचाऱ्यास माहिती मिळताच त्यांनी तेथील सर्व छायाचित्रण करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखविले. याबाबत प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीने त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: तरुणीची फसवणूक करुन थाटला दुसऱ्याच तरुणीशी विवाह

त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ करत घडलेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या घटनेत भालेकर शाळेच्या आवारात सर्रास मद्याच्या पार्ट्या होत असल्याचा पुरावा शाळेच्या आवारात मद्याच्या पडलेल्या बाटल्या रूपात मिळून आला. मद्याच्या बाटल्या, त्यासाठी लागणारे पाण्याची बाटली, अन्य वस्तू तसेच काही फोडलेल्या मद्याच्या बाटल्यांचे अवशेष शाळेच्या आवारात दिसून आले.

त्यास लागून असलेल्या जीपीओ जलकुंभ परिसरातदेखील मोठ्या प्रमाणावर मद्यसेवन करणे, गांजा, भांगेचा नशा करणे, असे प्रकार सुरू असतात. शाळेत आणि जलकुंभात कुठली प्रकारची सुरक्षा नसल्याने नशेबाजांना या जागा त्यांच्या पथ्यावर पडत आहे. याचबरोबर फुले मार्केट येथील ड्रेनेज फिल्टर प्लॅन आवारात दैनंदिन जुगाराचे डाव रंगणे, विविध प्रकारची नशा करणे, असे प्रकार सुरू असतात.

हेही वाचा: मोहात अडकला रिक्षाचालक, महिलेने घातला पावणे दोन लाखांना गंडा

Web Title: Alcohol Party In Nashik Municipal Building

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top