ऑल इंडिया कंजरभाट
जातीय क्रिकेट स्पर्धा
---
आज समारोप; एकूण १२ संघांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१५ : येथील जी. एस. मैदानावर ऑल इंडिया कंजरभाट जातीय क्रिकेट दिवसरात्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद् घाटन नरडाणा येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल नेतलेकर, लखन नेतले यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.
यावेळी बिरजू नेतलेकर, मोहन गारुंगे, नरेश बागडे, शशिकांत बागडे, मोहन चव्हाण, संजय मोती, प्रदीप नेतलेकर, योगेश बागडे, मंगल गुमाने, संतोष गारुंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. नेतलेकर म्हणाले की, क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तर तो एकजुटीचा संदेश देणारा खेळ आहे. क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू कितीही चांगला असला, तरी संपूर्ण संघाची साथ मिळाल्याशिवाय विजय मिळविता येत नाही. अगदी त्याचप्रमाणे समाजातही एखादी व्यक्ती मोठी होऊन उपयोग नाही, तर संपूर्ण समाजाने एकत्र येऊन प्रगती करणे गरजेचे आहे. समाजातील तरुणांना क्रीडा क्षेत्रात व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील खेळाडूवृत्तीला प्रोत्साहन मिळावे, समाजबांधवांत एकोपा, बंधुभाव व संघटन भावना वृद्धिंगत व्हावी, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे कार्तिक बाटुंगे यांनी सांगितले. या स्पर्धेत जळगाव, नंदुरबार, कोल्हापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर व अहमदाबाद येथील एकूण १२ संघ सहभागी आहेत. सोमवारी(ता.१६) अंतिम सामने होणार आहेत. गणेश नेतलेकर यांच्या स्मरणार्थ लखन नेतलेकर व राहुल नेतलेकर भाईराजा ग्रुप नरडाणातर्फे रोख एक लाख रुपयांपर्यंत रोख बक्षीस देण्यात येतील. राज नेतलेकर, गणेश बागडे, राज गागडे, गौतम टीलंगे, गोविंद दहियेकर यांच्यासह युवक सहकार्य करीत आहेत.