कळवण- आदिवासींना आदिवासींच्या जमिनी विक्रीच्या परवानग्या मिळाव्यात, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले..मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल असलेल्या प्रकरणाचा निपटारा करावा. अशी मागणी करीत, आदिवासी विकास परिषदेचे उपाध्यक्ष एमिल बागूल यांनी निवेदन दिले. निवेदनाचा आशय असा येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यकक्षेत कळवण आदिवासी बहुल तालुक्यातील शेतजमिनीच्या विविध प्रकारच्या वादावर सुनावणी केली जाते. .या कार्यालयामार्फत, आदिवासींच्या जमिनी आदिवासींना खरेदी/विक्री करण्यासाठीच्या परवान्यासाठी कळवण तालुक्यातील शेकडो आदिवासींच्या जमिनींचे विक्री परवानगीचे प्रस्ताव येथे प्रलंबित आहेत. प्रस्तावित जमीन खरेदी/विक्रीची परवानगीसाठी प्रस्ताव दाखल केल्यानंतर ते चौकशीसाठी पुन्हा खाली संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकाऱ्याकडे पाठविले जातात. यासाठी आवश्यक असणाऱ्या संपूर्ण कागदपत्रांची पुर्तता करून,पुन्हा हे परवानगीचे प्रस्ताव तहसीलदार यांच्या अभिप्रायासह अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यासाठी ५ ते ७ महिन्याचा कालावधी जातो. परिणामी आदिवासी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो..कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी या प्रस्तावात अनावश्यक तृटी काढून विनाकारण शेतकऱ्यांना त्रास देतात. ज्यांचे परवानगीचे प्रस्ताव कार्यान्वित अथवा प्रलंबित आहेत. ते शेतकरी त्याच्या विरुद्ध लेखी तक्रार करीत नाहीत.कारण तक्रार केल्यास आपला प्रस्ताव मंजूर होणार नाही. अशी भीती आदिवासी शेतकऱ्यांमध्ये आहे. कळवण तालुक्यातील बहुतांशी आदिवासी बांधव अशिक्षित व अडाणी असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन अनेक जण यात दलाली करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. .फक्त नविन अविभाज्य शर्तीच्या जमिनीचे प्रस्तावच संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी पाठविले जात होते. यात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक व आर्थिक मनस्ताप होत आहे. हे प्रकार त्वरित न थांबल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने निवेदनात दिला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.