कुरघोडीचे राजकारण सोडून विकासासाठी एकत्र यावे - डॉ. राजेंद्र गवई

Dr. Rajendra Gawai
Dr. Rajendra Gawaiesakal

नाशिकरोड : केंद्र सरकार राज्यातील महाआघाडीच्या नेत्यांविरुध्द ईडी (ED), सीबीआय (CBI) सारख्या यंत्रणाचा वापर करत आहे. तर महाआघाडी (Mahavikasaghadi) सरकार भाजपच्या नेत्यांना अडकविण्यासाठी आपल्या यंत्रणांचा वापर करत आहे. पूर्वीचे नेते अशा कुरघोडी करत नव्हते. कुरघोडीची अशी संस्कृती महाराष्ट्रात नव्हती. कुरघोडीचे राजकारण सोडून सर्वांनी देशाच्या विकासासाठी एकत्र यावे अशी माझी भाजप (BJP) व आघाडी सरकारला विनंती आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी केले. नाशिक रोड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पक्ष बांधणी व निवडणूक तयारी आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

काँग्रेस पक्ष छोट्या मित्रांना घेऊन चालत नाही

गवई म्हणाले, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ओवैसी यांचा एमआयएम (MIM) पक्ष उमेदवार उभे करत असल्यामुळे भाजपचा कायम फायदा होत आला आहे. भाजपला सत्तेपासून परावृत्त करायचे असेल तर एमआयएमला आघाडीमध्ये समाविष्ट करण्याबाबत फेरविचार करावा, एमआयएमबाबत फेरविचार केला नाही तर भाजपच पुन्हा सत्तेत येईल. एमआयएमला महाविकास आघाडीत घेतले तर आघाडी मजबूत होईल हे आघाडीतील अन्य पक्षांच्या नेत्यांना पटवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जो पक्ष आम्हाला सन्मानाची वागणूक देईल त्याच्याशीच आम्ही युती करू, अन्यथा स्वतंत्रपणे लढू असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्ष आमच्या सारख्या छोट्या मित्रांना घेऊन चालत नाही. त्यांनी मित्र पक्षांना कमजोर केले. त्याचा फटका काँग्रेसलाच बसत आहे. आम्ही चिल्लर पक्ष असलो तरी चिल्लर एकत्र केली नाही तर काँग्रेसचा रुपया तयार होणार नाही असेही गवई यांनी सुनावले.

Dr. Rajendra Gawai
नाशिक : राजकारण- प्रशासनाचा हातात हात! रेशन दुकानदाराची अडवणूक

रिपब्लिकनचे विविध गट एकत्र येण्याबाबत मी रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकरांशी चर्चा केली. मात्र, आंबेडकर तयार नाहीत. सर्वांनी विकासासाठी एकत्र यांवे.

यावेळी जिल्हाध्यक्ष भारत पुजारी, सरचिटणीस प्रकाश बाजपेयी, उपाध्यक्ष राजू गांगुर्डे, मुन्ना शेख, प्रकाश पगारे, रामचंद्र खोब्रागडे, सिध्दार्थ पवार, शैलेश खडांगळे आदी उपस्थित होत.

Dr. Rajendra Gawai
गुलाम नबी आझाद म्हणाले, ...त्याला पाकिस्तान, दहशतवाद जबाबदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com