नाशिक : ठरलं तर..! 13 डिंसेंबरपासून उघडणार शाळा; पालिकेची घोषणा

Pune school reopen
Pune school reopenSakal

नाशिक : महापालिका हद्दीमधील शासकीय, अनुदानित व विनाअनुदानीत शाळा (School Reopen) सोमवार पासून (ता. १३) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साठ टक्के पालकांनी संमती दर्शविल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) यांनी दिली. दरम्यान शिक्षकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आला. (School Reopening from 13 December 2021 in Nashik)

गेल्या 20 महिन्यांपासून राज्यातील शाळा कोरोनामुळे बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १० वी तसेच महाविद्यालये सुरू करण्यात आले. ग्रामीण भागात ५ वी ते १० व महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. प्राथमिक शाळा एक डिसेंबर पासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला परंतू शाळा सुरु करताना स्थानिक प्रशासन प्रमुखांची परवानगी आवशक्य करण्यात आली होती. ओमायक्रॉनच्या धर्तीवर महापालिका आयुक्त जाधव यांनी दहा डिेसेंबरपर्यंत शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला. त्यापुर्वी नऊ डिसेंबरला पालक संमतीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे सुचित करण्यात आले होते त्यानुसार साठ टक्के पालकांनी संमती दिल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या तेरा डिसेंबर पासून शाळांची घंटा खणाणणार आहे.

Pune school reopen
नाशिक : भद्रकाली परिसरात दीडशे वर्षांपूर्वीचा कुंटणखाना सील

शिक्षकांचे लसीकरण, पालकांची संमती

पालिकेच्या शिक्षण विभागाने तयार केलेल्या अहवालामध्ये साठ टक्के पालकांनी शाळा सुरु करण्यास संमती दिली तर चाळीस टक्के पालकांनी ओमायक्रॉनच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास नकार दिला आहे. दरम्यान महापालिका व खासगी शाळांमध्ये एकुण चार हजार २७३ शिक्षक असून त्यापैकी चार हजार २७० शिक्षकांची कोरोना प्रतिबंधात्मक डोस पुर्ण झाले आहे. तसेच ३०९ शाळांपैकी २९५ शाळांमध्ये निर्जंतुकीकरण पूर्ण झाल्याचे शिक्षण विभागाकडून माहिती देण्यात आली. शाळांमध्ये हॅण्डवॉश, तापमापक व सॅनिटायझर्सची व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

शाळा सुरु करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. समितीच्या सुचनेनुसार पहिली ते सातवीचे वर्ग तेरा डिसेंबर पासून सुरु केले जाणार आहे.- सुनिता धनगर, प्रशासनाधिकारी, महापालिका.

Pune school reopen
Omicron Variant | नाशिक शहरात ५६० परदेशी नागरिकांचे आगमन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com