अंबड पाणी पुरवठा

अंबड पाणी पुरवठा
Published on: 
पान एक मेन (महापालिका इमारत घेणे) ----------------------- अंबडच्या दत्त नगरला टँकरने पाणीपुरवठा दोन दिवसात महापालिकेकडून १५० नवीन नळजोडण्या सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : अंबड येथील दत्त नगर परिसरातील कुपनलिकांमधून आरोग्याला घातक असे पिवळे पाणी येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या वतीने तातडीची उपाययोजना म्हणून अमृत-२ योजनेतून दीडशे नवीन नळजोडण्या दिल्या जात आहेत. आतापर्यंत ६० जोडण्यांचे काम पुर्ण झाले असून गुरुवारपर्यंत सर्वेक्षण करण्यात आलेल्या बाधित भागातील नळजोडण्या दिल्या जाणार असल्याने या भागातील पाणीटंचाईची समस्या मिटणार आहे. अंबड येथील दत्तनगर परिसरातील कूपनलिकांमधून रसायनयुक्त पिवळे पाणी येत असल्याची बाब उघड झाल्यानंतर खळबळ उडाली. या पाण्यात कर्करोगास कारणीभूत क्रोमियम हेक्साव्हॅलेंटचे प्रमाण अपेक्षित मर्यादेपेक्षा तब्बल हजारपट अधिक आढळले असून पाण्याच्या नमुन्यांमध्ये प्रतिलिटर ०.०५ मिलिग्रॅम अपेक्षित असताना तब्बल ५०.३ मिलिग्रॅम क्रोमियम आढळल्याची माहिती समोर आली. या संदर्भातील अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला. त्यापूर्वी पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके यांनी या भागात पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या होत्या. ------ २९ हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न दूषित पाण्यामुळे अंबड परिसरातील सुमारे २९ हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने कुपनलिका सील करण्यात आल्या तर परिसरातील ५० हून अधिक उद्योगांची तपासणी करून त्यातील दहाहून अधिक उद्योगांवर कारवाई करण्यात आली आहे. पाण्याच्या संपर्कामुळे काही नागरिकांना त्वचेचे विकार जडल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले आहे. आतापर्यंत १९ रहिवाशांना त्वचेचे विकार झाल्याची नोंद आहे. महापालिकेच्या अंबड शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात आरोग्य विभागाने संशयित क्लस्टरमध्ये रुग्णांची तपासणी सुरू केली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या पथकाने आतापर्यत २४८ रुग्णांची तपासणी केली असता, १०९ रुग्णांमध्ये त्वचारोगाची लक्षणे आढळून आली आहेत. कूपनलिकेच्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये त्वचा रोगाची समान लक्षणे आढळून आल्याचा प्राथमिक निष्कर्ष वैद्यकीय विभागाने काढला. --------------- अमृत योजनेतून नळजोडण्या दरम्यान या भागाकडे महापालिकेच्या वतीने तातडीने लक्ष केंद्रीत करताना कूपनलिका सील करण्यात आले. तर याठिकाणी पाच पिण्याच्या छोट्या टाक्यांची व्यवस्था करण्यात आली तर दररोज तीन टँकरद्वारे दिवसभर पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. अमृत-२ योजनेतून गुरुवार (ता.१५) पर्यंत १५० अर्धा ते एक इंची नळजोडणी देण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले असून आतापर्यंत ६० नवीन जोडण्यात देण्यात आल्या आहेत. पुढील चार दिवसात जुन्या जलवाहिन्या पुर्णपणे बदलण्यात येणार आहे. अंबडच्या दत्तनगर भागात अमृत योजनेतून १५० नळजोडण्या दिल्या जात आहे. जुन्या मोठ्या जलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रवींद्र धारणकर, अधिक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com