Nashik Crime : अंबडमधील ७ लाखांच्या चोरीचा पर्दाफाश; चौघांसह एका अल्पवयीनाला अटक
Arrests Made in Ambad MIDC Factory Theft : अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीमध्ये ७ लाख रुपयांची चोरी करणाऱ्या चौघा आरोपींना आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा माल आणि वाहन जप्त केले.
नाशिक: अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीची संरक्षण भिंत तोडून सुमारे सात लाखांचे साहित्य चोरून नेणाऱ्या चौघांसह विधीसंघर्षित बालकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. अंबड पोलिस ठाण्याच्या चुंचाळे पोलिस चौकीच्या पथकाने कारवाई केली आहे.