Nashik News : आईबाबांचा जीवघेणा निर्णय ; दोन चिमुकल्यांच्या भवितव्याचा प्रश्न अनुत्तरित
Shocking Suicide Attempt by Couple in Ambad : पती-पत्नीने विषारी औषध प्राशन करून आणि हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.
सिडको- अंबडमधील फडोळ मळा परिसरात पती-पत्नीने विषारी औषध प्राशन करून आणि हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. १४) दुपारी घडली. या घटनेत दोघांचीही प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.