सातपूर- सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सामूहिक मलनिस्सारण केंद्र (सीईटीपी) प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळाली आहे. ‘एमआयडीसी’चे अधीक्षक अभियंता बाळासाहेब झंजे यांनी दोन दिवसांपूर्वीच कामाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ‘एमपीसीबी’च्या कारवाईच्या छायेत असलेल्या प्लेटिंग उद्योगांसह शेकडो कारखान्यांना दिलासा मिळणार आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी ‘सकाळ’ने सातत्याने आवाज उठवत प्रभावी पाठपुरावा केला होता.