स्वप्नातील प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी सामाजिक लढा तरुणांनी हातात घ्यावा! डॉ. भिमराव आंबेडकर,सुजात आंबेडकर यांनी येवल्यात मुक्तीभूमीवर केले अभिवादन

स्वप्नातील प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी सामाजिक लढा तरुणांनी हातात घ्यावा! डॉ. भिमराव आंबेडकर,सुजात आंबेडकर यांनी येवल्यात मुक्तीभूमीवर केले अभिवादन
Published on: 
पान तीन ॲंकर --------------- 27175 येवला : मुक्तीभूमी येथे सभेत बोलताना भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर. प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी सामाजिक लढा तरुणांनी हातात घ्यावा डॉ. भीमराव, सुजात आंबेडकर यांच्याकडून मुक्तीभूमीवर अभिवादन सकाळ वृत्तसेवा येवला, ता. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे धम्माचे बंड पुकारले, त्याचप्रमाणे आता त्यांच्या स्वप्नातील प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी त्यांचा राजकीय आणि सामाजिक लढा तरुणांनी हातात घेतला पाहिजे असे आवाहन येथील जाहीर सभेत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केले. येथील ऐतिहासिक मुक्तीभूमी येथे धर्मांत्तर घोषणेच्या ९१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर, अमन आंबेडकर उपस्थित होते. राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातुन लाखो भीम अनुयायी मुक्तीभुमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून लाखोचा भिमसागर नतमस्तक झाला. आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाखोडे याच्या आत्महत्येस तेथील जातीवादी व्यवस्थाच जबाबदार असून हा निव्वळ अपघात नसून इन्स्टिट्यूशनल खून असल्याचा घणाघाती आरोप केला. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक राजकीय विचारांवर भर देत समाजाने प्रगती साधावी असे ते म्हणाले. वर्षानुवर्षे केलेल्या संघर्षानंतर आता नव्या पिढीवर आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत सर्व तरुण एकत्र येऊन लढा देत नाहीत, तोपर्यंत समाजात कोणतीही खरी क्रांती घडू शकणार नाही असे अमन आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष ऍड.एस.के.भंडारे, बी. एच. गायकवाड, भिकाजी कांबळे, यु.जी.बोराडे, अशोक केदारे, गौरव पवार, देवेंद्र उबाळे, चेतन गांगुर्डे, भाऊसाहेब अहिरे, कृष्णाजी सोनवणे, संदीप खरे, वनीता मोरे, लतिका निरभवणे, दीपक गरुड उपस्थित होते. शरद भोगे यांनी सूत्रसंचालन तर रितेश गांगुर्डे यांनी आभार मानले. ------ विविध प्रश्नांवर सरकार अपयशी : सुजात आंबेडकर बाबासाहेबांचा लढा केवळ धम्मापुरता मर्यादित नसून तो सामाजिक आणि राजकीय बंड होता, जो आता प्रत्यक्ष जमिनीवर उतरवण्याची वेळ आली आहे. देशातील निवडणूक प्रक्रियेवरील वाढत्या अविश्वासावर चिंता व्यक्त करत ते म्हणाले की, नागरिक व विद्यार्थी रस्त्यावर उतरत असून निवडणूक आयोगावरील विश्वास उडाला आहे.ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. नरेंद्र मोदी हे असे घाबरट पंतप्रधान आहेत, जे पहिल्यांदा पंतप्रधान असतील जे स्वतःच्या जनतेला आणि नागरिकांना घाबरून घरात बसले अशी टीका यावेळी सुजात आंबेडकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com