amit deshmukh
amit deshmukhesakal

आता परीक्षा पुढे ढकलणे शक्‍य नाही : अमित देशमुख

Published on

नाशिक : कोरोना महामारीमुळे (corona pandemic) वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या (medical exam) परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काही विद्यार्थी संघटनांकडून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी ट्विटरद्वारे भूमिका स्‍पष्ट केली असून, आता परीक्षा पुढे ढकलणे शक्‍य नसल्‍याचे त्यात नमूद केले आहे.

वैद्यकीयच्‍या परीक्षांबाबत स्‍पष्ट केली भूमिका

मंत्री देशमुख यांनी म्‍हटले आहे, की कोविड- १९ ची परिस्‍थिती असली तरी, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्‍या लेखी व प्रात्‍यक्षिक परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाइन घेणे नियमाला अनुसरून नाही. पालक व विद्यार्थ्यांनी ही बाब समजून घेत, अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. १० जूनपासून परीक्षा घेण्याचे निश्‍चित झाले आहे. कोविड-१९च्या प्रादुर्भावात वाढ न झाल्‍यास परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचे नियोजन आहे. परीक्षा रद्द कराव्‍यात, पुढे ढकलाव्‍यात, अशी मागणी होत आहे. परंतु वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी भविष्यात डॉक्‍टर होऊन जनतेच्‍या आरोग्‍याची काळजी घेणार आहेत. अशा महत्त्वाच्‍या क्षेत्रात काम करण्याची जबाबदारी घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्‍या परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाइन घेणे सयुक्तिक ठरणार नाही.

विद्यार्थ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया

मंत्री देशमुखांनी केलेल्‍या ट्विटला विद्यार्थ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. ऑनलाइन लेक्‍चर झाल्‍याने बऱ्याच संकल्‍पना स्‍पष्ट न झाल्‍याचे सांगतानाच ऑनलाइन परीक्षेचा आग्रह धरला. तर काहींनी परीक्षा व्‍यवस्‍थेच्‍या संदर्भातील सूचना नमूद केल्‍या.

amit deshmukh
विशेष पोलिस अधिकाऱ्यांना नागरिकांना मारण्याचा अधिकार नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com