Nashik : अमित ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांचा पत्ता कट

MNS Student Sena President Amit Thackeray while interacting with students
MNS Student Sena President Amit Thackeray while interacting with studentsesakal

नाशिक : राज्याच्या राजकारणात संपूर्ण ताकदीनिशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे मैदानात उतरले आहे. राज्याच्या आतापर्यंतच्या राजकारणाचा विचार करता नेता व तळातला कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांचा संबंध न ठेवता थेट संवादाचे हत्यार उपसले आहे. मनसे विद्यार्थी सेनेच्या जवळपास साडेतीन ते चार हजार सदस्यांशी संपर्क साधताना त्यांनी थेट मोबाईल क्रमांक देऊन चर्चा करण्याचे आवाहन केले. (Amit Thackeray MNS Nashik Tour Nashik Latest Marathi political News)

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे गेल्या चार दिवसांपासून नाशिकच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी तालुकानिहाय महाविद्यालयांमध्ये पोचून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभाचा वारसा अमित यांनी चालविल्याने महाविद्यालयांमधून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

अमित यांच्या महासंवाद यात्रेचा मंगळवारी (ता.९) शेवटचा दिवस होता. यानिमित्त पक्षाच्या राजगड कार्यालयात महासंवाद मेळावा झाला. ४० विद्यार्थ्यांचा एक गट याप्रमाणे अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या गटाशी संवाद साधला.

संवादात विद्यार्थ्यांना महाविद्यालयात भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. सामाजिक स्तरावर विद्यार्थ्यांचे काय परिस्थिती आहे, याचाही आढावा घेतला. अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना थेट मोबाईल क्रमांक देऊन संवाद साधण्याचे आवाहन केले.

या वेळी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार ईचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, समन्वयक सचिन भोसले, मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भंवर व गणेश मोरे, जिल्हाध्यक्ष श्याम गोहाड व कौशल पाटील, शहराध्यक्ष संदेश जगताप व ललित वाघ, मनविसे विभाग अध्यक्ष अविनाश जाधव, मेघराज नवले, सिद्धेश सानप, अक्षय गवळी, सार्थक देशपांडे, गणेश शेजूळ, मयूर रावळे आदी उपस्थित होते.

MNS Student Sena President Amit Thackeray while interacting with students
गोदाघाटावर भाविकांभोवती रिक्षाचालकांचा अक्षरश: गराडा

मनसेच्या रूपाने सक्षम पर्याय

राज ठाकरे यांच्या विकासाभिमुख राजकारणाकडे आजचा तरुण वर्ग आकर्षित होत असून, मनसेच्या रूपाने राज्याच्या राजकारणात तरुणांना एक सक्षम पर्याय उपलब्ध असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले.

या वेळी विद्यार्थ्यांना थेट संवाद साधण्याचे आवाहन त्यांनी केले. मनसेत विद्यार्थ्यांना भवितव्य आहे. सक्षम देश बनण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले. आठवडाभरात विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे नवीन जबाबदारी येणार असून, लवकरच मुंबईत पाचारण केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

MNS Student Sena President Amit Thackeray while interacting with students
तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी MSRTCतर्फे 230 बस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com