भुजबळाच्या उपस्थितीत अमोल शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ते पदी नियुक्ती, प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे - भुजबळ

भुजबळाच्या उपस्थितीत अमोल शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ते पदी नियुक्ती, प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे - भुजबळ
Published on: 
फोटो- 27026 येवला : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर अमोल शिंदे यांना नियुक्तिपत्र देताना समीर भुजबळ व पदाधिकारी. अमोल शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्तेपदी नियुक्ती सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ५ : मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून मतदारसंघात विकासाची कामे अविरतपणे सुरू असल्याने अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडले जात आहे. सोमवारी (ता. ५) अमोल शिंदे यांच्यासारखा सामाजिक कार्यकर्ता आल्याने पक्षाची अधिक ताकद वाढणार आहे. सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. येथील रामगीत लॉन्स येथे अमोल शिंदे यांनी भुजबळ यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शिंदे यांना उपजिल्हाध्यक्ष व येवला मतदारसंघातील प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली. माजी सभापती संभाजी पवार, राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, नगरध्यक्ष राजेंद्र लोणारी, अरुण थोरात, काशीनाथ शिंदे, हुसेन शेख, दीपक लोणारी, प्रवीण बनकर, गणेश शिंदे, सुनील शिंदे, संजय शिंदे, मकरंद शिंदे, शिवाजी शिंदे, दयानंद जावळे, सुनील जाधव आदी उपस्थित होते. भुजबळ म्हणाले, की केंद्र आणि राज्य सरकारमध्ये महायुतीचे सरकार आहे. ज्याप्रमाणे केंद्र राज्य सरकारमध्ये आपण काम करतो त्याच प्रमाणे पालिकेतही काम करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यादृष्टीने सर्वांना सोबत घेऊन काम करण्यात येत आहे. पालिकेची टीम भक्कम असून शहराचा विकास अधिक गतिमान होणार आहे. शहराला स्वच्छ सुंदर आणि विकसित करण्याचा आपला मानस आहे. अमोल शिंदे म्हणाले, की मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. या मुद्यावरच आपण पक्षात प्रवेश करीत आहोत. त्यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे करण्यास प्राधान्य देऊ तसेच जनतेचे प्रश्न सोडवू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com