CIIIT Centers
sakal
नाशिक: राज्यातील नाशिक व अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अॅन्ड ट्रेनिंग (सीआयआयआयटी) म्हणजेच सी- ट्रिपल आयटी केंद्र साकारण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून तसेच टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या सहकार्याने हे केंद्र उभे राहणार आहे. हे केंद्र म्हणजे उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्याच्या प्रयत्नांचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.