अमृतस्नानांच्या तीन प्रमुख पर्वणी

अमृतस्नानांच्या तीन प्रमुख पर्वणी
Published on: 
ध्वजारोहण पुरवणी लेख --- अमृतस्नानांच्या तीन प्रमुख पर्वण्या लीड सिंहस्थ कुंभमेळ्यात अमृतस्नानाच्या तीन प्रमुख पर्वण्यांना विशेष धार्मिक महत्त्व आहे. पहिले अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७, दुसरे ३१ ऑगस्ट २०२७, तर तिसरे अमृतस्नान नाशिक येथे ११ सप्टेंबर आणि त्र्यंबकेश्वर येथे १२ सप्टेंबर २०२७ ला नियोजित आहे. या प्रमुख पर्वण्यांसह अन्य १३ पर्वणीस्नानांच्या तारखाही उपलब्ध नियोजनात नमूद आहेत. अतिमहत्त्वाच्या तारखा पहिले अमृतस्नान सोमवार, २ ऑगस्ट २०२७ ला होणार आहे. ही सोमवती अमावास्येची पर्वणी असेल. दुसरे अमृतस्नान मंगळवार, ३१ ऑगस्ट २०२७ ला, तर तिसरे अमृतस्नान नाशिकमध्ये शनिवार, ११ सप्टेंबर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये रविवार, १२ सप्टेंबर २०२७ ला नियोजित आहे. नाशिकमधील रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ ही या स्नानपर्वण्यांची प्रमुख धार्मिक केंद्रे आहेत. -- अन्य महत्त्वाच्या पर्वण्यांच्या तारखा : ता. १४ ऑक्टोबर २०२७ ला कोजागरी पौर्णिमा, २८ ऑक्टोबरला शुद्ध पौर्णिमा, १३ नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा आणि २७ डिसेंबरला सोमवती अमावस्या आहे. त्यानंतर २७ जानेवारी २०२८ ला शुद्ध प्रतिपदा, १ फेब्रुवारीला वसंत पंचमी, ९ मार्चला शुद्ध पौर्णिमा, २१ मार्चला पापमोचनी एकादशी, ५ एप्रिलला शुद्ध एकादशी, २७ एप्रिलला अक्षयतृतीया, १ मेस गंगा जन्मोत्सव, २८ मेस विद्या अमावास्या आणि २ जून २०२८ ला गंगा दशहरा या पर्वण्यांचा समावेश आहे. -- अमृतस्नानांचे धार्मिक स्थान हिंदू धार्मिक परंपरेत कुंभपर्वणीच्या दिवशी पवित्र तीर्थात स्नान, दानधर्म, जप, तप आणि धार्मिक विधी करण्याला महत्त्व आहे. अमृतस्नानाच्या वेळी आखाड्यांच्या साधू-संतांचे स्नान, मिरवणुका आणि संन्यासी परंपरांचे दर्शन हे कुंभमेळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य असते. पौर्णिमा, अमावास्या, एकादशी, तसेच अक्षयतृतीया आणि गंगा दशहरा यांसारख्या पर्वदिवशीही भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असते. -- दोन तीर्थक्षेत्रे, एक सिंहस्थ : रामतीर्थ हे गोदावरीच्या तीरावरील प्रमुख तीर्थ असून, धार्मिक स्नान आणि पितृविधींसाठी प्रसिद्ध आहे. त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ हे गोदावरी नदीच्या उगमपरंपरेशी जोडलेले पवित्र कुंड आहे. सिंहस्थात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणांना स्वतंत्र धार्मिक आणि व्यवस्थापकीय महत्त्व आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com