कळवण: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची अंमलबजावणी कळवण तालुक्यात ठप्प झाल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. या योजनेंतर्गत गर्भवती व स्तनदा मातांना दिला जाणारा नियमित पौष्टिक आहार निधीअभावी बंद पडल्याने अनेक महिला व बालके यापासून वंचित राहत आहेत. विशेषतः आदिवासी भागातील महिलांच्या आणि बालकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.