नाशिक- शहरातील नागरिकांची वाढती पाण्याची तहान भागविण्यासाठी महापालिकेने केंद्र सरकारच्या अमृत-२ योजनेतून अमलात आणण्याच्या २८४ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला स्थायी समितीने हिरवा कंदील दिला आहे. यासाठी कंपनीसोबत करारनामा झाल्यानंतर कामाला सुरुवात होऊन सिंहस्थपूर्वी पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आणली जाणार आहे.