BSW26B12136
भुसावळ : आनंदाचा मळा या मंगला बोरोले यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी माजी खासदार डॉ उल्हास पाटील, गोवर्धन राणे, डॉ. अरविंद कोलते, प्राचार्य डॉ. संजय पाटील, डॉ. मनोज महाजन, डॉ. नीलिमा नेहेते आदी.
-----------------
बोरोलेंच्या कविता लवकरच संगितबद्ध करणार
-----
डॉ. पाटील : भुसावळात ‘आनंदाचा मळा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. ५ : कवियित्री मंगला बोरोले यांच्या निवडक कविता आमच्या गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून लवकरच संगितबद्ध केल्या जातील. ही जबाबदारी डॉ. वर्षा पाटील यांच्याकडे दिल्याची घोषणा माजी खासदार व गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी केली. बोरोले यांच्या ''आनंदाचा मळा'' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
शहरातील ‘आयएमए’च्या हॉलमध्ये झालेल्या या समारंभात मलकापूर येथील भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष डॉ. अरविंद कोलते, निवृत्त सरकारी अधिकारी गोवर्धन राणे, खामगाव येथील सहकार महर्षी शिंगणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील, मुक्ताईनगर येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मनोज महाजन, प्राचार्य अनिल खर्चे, डॉ. संजय नेहेते आदी मंचावर होते. मंगला बोरोले म्हणाल्या की, मला मित्र-मैत्रिणी व नातेवाईक यांना वाढदिवसाच्या निमित्ताने भेटकार्ड तयार करून ते पाठविण्याचा छंद होता. त्या कार्डवर काव्यात्मक रचना करून पाठवत असत. पतीचा अमृतमहोत्सव व आमच्या लग्नाच्या रौप्यमहोत्सव व सुवर्णमहोत्सव प्रसंगाच्या फोटो अल्बममध्ये काव्यरचना केल्या. याची ''आठवणींचा मोरपीसारा'' ही पुस्तिका प्रकाशित केली होती. यश मिळवण्यासाठी मी मुंगीचा आदर्श घेते. तिच्या चिकाटी व एकजुटीमुळे वारुळाची निर्मिती होते. प्राचार्य पाटील, चंदा निळे (श्रीरामपूर), डॉ. मनोज महाजन, डॉ. अरविंद कोलते (मुक्ताईनगर) यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक संदिप बोरोले यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती महाजन यांनी केले. डॉ. नीलिमा नेहेते यांनी आभार मानले.