Education
sakal
नामपूर: केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणात बालकांच्या सर्वांगीण विकासाचा पाया असलेल्या अंगणवाडी केंद्रांना अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. मात्र, राज्यातील तब्बल ३८ हजार अंगणवाड्यांना अद्यापही स्वतःच्या इमारती नाहीत, ही बाब गंभीर चिंता निर्माण करणारी आहे.